Friday, April 3, 2015

ओह रंगरेज

जाणकार आणि रसिक हे खूप मोठे शब्द आहेत यातला नेमका फरक आपल्याला कळत नाही. 'संगीत' जे ऐकताना मन तल्लीन होऊन जाते अशा काही रचनांचे मुक्तकंठाने प्रशंसा करावी म्हणून हा लेख लिहित आहे. 'भाग मिल्खा भाग ' या चित्रपटात एक सुंदर गाणे आहे 'ओह रंगरेज तेरे रंग दारीयावे । डूबना है बस तेरा बनके ।  उत्तम चाल, मनाला  भिडणारे शब्द आणि चित्रपटात केलेले सुंदर चित्रण अशी  थोडक्यात  या गाण्याची पार्श्वभूमी आहे. पहिल्यांदा पहिले तेव्हाच हे गाणे मला खूपच आवडले होते. आणि त्याचा व्हिडीओ मी अनेकदा पहिला होता. 'यु ट्युब' वर या गीताचा मला अजून एक  व्हिडीओ पाहण्यात आला. 'ओह रंगरेज कवर बाय रोहन एंड शंतनू फेट राजू धुमाळ एंड  अभिमन्यु हेर्लेकर अस या दुव्याच नाव आहे.

अतिशय कमी प्रमाणात वापरलेली वाद्य कीबोर्ड, तबला, सन, (बोली भाषेत पिपाणी म्हणतात ) आणि एक छोटा टाळ. गायक शंतनू हेर्लेकरचा उत्तम आवाज या गाण्याला मूळ गायका पेक्षा जास्तच न्याय देतो, राजू धुमाळच्या  सन वादनाची प्रशंसा करावी तेवढी कमीच, अभिमन्यु हेर्लेकरने सुद्धा तबला  उत्तम वाजवला आहे. रोहन पटेलचा कीबोर्ड तर अप्रतिम.  मला तर खूपच आवडलं, खरच खूप छान कवर केलं आहे. संगीत ही अशी गोष्ट आहे ज्यावर वाचण्यापेक्षा अनुभवण्यातच खरी मजा असते.  व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी. प्रत्येकाची आवड, रुची वेगळी असते पण एक वेळ ऐकण्यात काय हरकत आहे



ओह रंगरेज

2 comments: