राजस्थान
मध्ये श्री गंगानगर या जिल्हयाच्या ठिकाणी एका जवळच्या मित्राचं लग्न होत.
मी आणि माझा एक मित्र आनंद दोघांनी मित्राच्या लग्नाला जायचा बेत आखला.
दिल्लीवरून जायचे होते म्हणून राजधानी एक्सप्रेसची तात्कालिक तिकिट बुक
केली. दोन दिवसांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास राजधानी एक्सप्रेस मुंबई
सेन्ट्रल वरून सुटणार होती, म्हणून वेळेआधी आधी दादरला पोहचलो आणि ठरलेल्या
वेळेप्रमाणे मित्र सुद्धा भेटला गाडीसाठी दोन तास अवकाश होता, मित्र खूप
दिवसांनी भेटल्यानंतर गप्पा मारत आम्ही नाश्ता केला आणि प्रवासामध्ये
जरुरीचे काही सामान विकत घेतले, नंतर दादरहून मुंबई सेन्ट्रल गाठले.
रेल्वे
मुंबई सेन्ट्रल वरून वेळेत सुटली, डब्यामध्ये खूप सारे यंगस्टर्स होते,
त्यामुळे डब्यातले वातावरण 'फ्रेश टाइप' होते. राजधानी ची सेवा सुद्धा
अतिशय सुंदर होती, रेल्वे गुजरात जवळ पोहचल्यावर चहा कॉफी घेत गप्पा मारत
होतो, काही मुल मुली
सिगरेटी फुंकत होत्याच. सकाळी नऊ वाजता दिल्ली स्टेशन वर पोहचलो इथे एक
मित्र आम्हाला रिसीव्ह करायला आला होता त्याच्या घरी जाऊन फ्रेश झालो आणि
दिल्ली पाहण्यासाठी बाहेर पडलो. त्यादिवशी दिल्लीत रामलिला रथ फिरत होते
त्यामुळे रस्त्यावर भरपूर गर्दी होती, त्यातून वाट काढत काढत आम्ही चांदणी
चौकात पोहचलो तिथे जवळच 'पराठेवाली गल्ली' म्हणुन प्रसिद्ध आहे. तिथे
जवळपास पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे पराठे बनवले जातात. तिथे आम्ही काही
पराठे टेस्ट केले आणि तिथून मेट्रो मधून प्रवास करण्यासाठी निघालो. मेट्रो
आमच्यासाठी म्हणजे किमान माझ्यासाठी नवीनच होती कारण मी दिल्लीला
पहिल्यांदा आलो होतो. दिल्लीत फिरता फिरता पूर्ण दिवस कसा गेला कळलेच नाही.
त्याच दिवशी आम्हाला दिल्लीचा निरोप घ्यायचा होता कारण दोन दिवसांनी
गंगानगरला मित्राचं लग्न अटेन्ड करायचं होत.
दिल्लीमधून
रात्री नऊ ते दहाच्या सुमारास स्लीपर कोच खासगी गाडीने जायचे होते,
गंगानगर हे तसे पंजाब आणि राजस्थान च्या मधोमध होते आणि ते भारत
पाकिस्तानच्या सिमेलगत चे शहर होते. गाडी हरीयानामार्गे जाणार होती जेवण
आटोपून आम्ही गाडी पकडली, गाडीमध्ये काही पंजाबी भाषा बोलणारी मंडळी होती.
गाडी पूर्ण भरली नव्हती, गाडी तासा-दोन तासात हरियाना मधील 'रोहतक' शहराजवळ
आली. मी आणि मित्र स्लीपर कोचमध्ये झोपून गप्पा मारत होतो तेव्हा अचानक
आम्ही झोपलेल्या बाजूच्या काचेवर किमान पावकिलो वजनाचा एक दगड येउन आदळला
आणि बाजूच्या पूर्ण काचेचे बारीक तुकडे झाले आणि ते आमच्या शरीरावर उडाले.
त्यापैकी काही काचा मित्राच्या हातावर लागल्या होत्या. त्या अचानक
झालेल्या हल्ल्याने आम्ही गांगरलो होतो. काही बोलावे काहीच सुचत नव्हते
तोपर्यंत गाडी दोन ते तीन किलोमीटर पुढे गेली होती, गाडीच्या ड्राइवरला
याची काहीच भनक सुधा नव्हती त्याला आम्ही जबरदस्ती गाडी थांबवण्यास
सांगितली आणि खाली उतरून आजूबाजूला पहिले पण जिथे गाडीवर दगड मारला गेला ते
ठिकाण मागेच राहील होत त्यामुळे काहीच न बोलता आम्ही गाडीत येउन बसलो आणि
ज्या मित्राचं लग्न होत त्याला फोन करून सर्व हकीकत सांगितली त्यानेसुद्धा
अस कधीच घडल नव्हत अस सांगितले आणि पोहचण्याची वेळ सांगून आम्ही फोन ठेऊन
दिला. काही वेळाने मी आणि बरोबरच्या मित्राने ड्राइवरला बाथरूम ला
जाण्यासाठी गाडी थांबविण्याची विनंती केली आणि नेमकी त्याने गाडी एका
ढाब्यासमोर थांबवली आणि आमची बाथरूम ला जाण्याची पंचाईत झाली, पुन्हा
आम्ही ड्राइवरला "कुठे जाऊ ' म्हणुन विचारण्यास गेलो तर त्याने वैतागून
सीटवरूनच मागच्या बाजूला इशारा केला. मित्र अर्धवट झोपेत होता तो मला
गाडीतच बाथरूमची सोय आहे अस म्हणाला मला ते विचित्र वाटल मी म्हणालो
'लग्झरी कोचमध्ये बाथरूमची सोय कशी असू शकते' तर तो मला म्हणाला 'रुक मै
देखके आता हु' आणि तो गाडीमध्ये आत जाऊन अगदी मागच्या बाजूला गेला तर तिथे
अजून एक स्लीपर आसन होत तिथे एक माणूस पण झोपला होता आणि ते पडदे
लावल्यामुळे एखाद्या बाथरूम सारखे दिसत होते, ते पाहून आम्हाला खूप हसायला
आले आणि नंतर समजले कि ड्राइवरला गाडीमध्ये नव्हे तर गाडीच्या मागे
म्हणजे रस्त्यावर जाण्यासाठी इशारा करायचा होता, त्यावेळी आंम्हाला अक्षरश:
हसू आवरत नव्हते आणि हा विनोद आठवून आठवून आम्ही दोन दिवस बऱ्याचदा हसलो.
दुसऱ्यादिवशी
सकाळी आम्ही गंगानगरला सुखरूप पोहचलो, आणि दोन दिवसांनी लग्न आटोपून
मुंबईला परतलो फक्त एक गोष्ट जाणवली कि आपण इतर राज्यांपेक्षा महाराष्टात
बरेच सुरक्षित आहोत. आणि का कोणास ठाऊक पण महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी मी
तरी लगेच तयार नाही होत.
No comments:
Post a Comment