"ऐ तिथं हाथ लाऊ नको" अशा अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने तीन वर्षाचे मुल दचकले आणि फोटोसमोरचे उचलेले फळ तिथेच ठेऊन त्याने रडायला सुरुवात केली, मागून त्याची आई आली आणि मुलावर ओरडणारी वयस्क व्यक्ती काही बोलण्याआधी मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून त्याला तिथून घेऊन गेली. मोबाईल आणि वर्तमानपत्रात माना घातलेली सात-आठजण मात्र एक नजर टाकून पुन्हा काही-बाही वाचण्यात गुंग झाली. त्यांच्या साठी तो एक शोर्ट ब्रेक असावा. घराच्या मोकळ्या आवारात झाडाखाली हार घातलेल्या आणि अगरबत्ती लावलेल्या फोटोच्या डाव्या बाजूला आठ-दहा आणि उजव्या बाजूला तेवढ्याच खुर्च्या मांडल्या होत्या. खाली सतरंजीवर काहीजण बसले होते. मध्यभागी वर्तमानपत्राचे काही अंक ठेवले होते, त्यातले काहीजण पुन्हा -पुन्हा त्याच बातम्या वाचत होते. दोघेजण आपसांत लांबलेल्या पावसाविषयी एकमेकांना एकू येईल अशा आवाजात चर्चा करत होते, तर चारजण कॉलेजला जाणारा मुलगा अपघातात कसा गेला ?, दोन वर्षांपूर्वीच आजारात आई गेली आणि आता तरुण वयात हा मुलगा गेला म्हणून हळहळ व्यक्त करत होते. तिथूनच थोड्या अंतरावर काही बायका जमलेल्या माणसाच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या, त्यामध्ये एक साठी उलटलेले गृहस्थ स्वयंपाक चविष्ट होण्यासाठी आचारयाला सूचना करत होते तेवढ्यात त्या गृहस्थांच्या पत्नीने त्यांच्यावर डोळे मोठे करून पहिले आणि हा स्वयंपाक तेरावीचा आहे आणि तो हौसेने चालला नाही याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या सूचना बंद केल्या.
काहीवेळाने एक मध्यमवयीन स्त्री फोटोजवळ येउन गळा काढून रडू लागली त्यामुळे पुन्हा एकदा मोबाईल आणि वर्तमानपत्रातल्या माना वर झाल्या. अपघातात गेलेल्या मुलाचे वडील त्या स्त्रीचं सांत्वन करत तिला घेऊन ते घरात गेले. आता जवळपास सर्व नातेवाईक आणि ओळखीचे आजू बाजूचे लोक जमले होते. एक व्यक्ती चार फुले आणि चंदनाची पाने सर्वांच्या हातात देत होता. सर्वांनी पुढे होऊन ती पाने -फुले फोटोसमोर ठेऊन आपली श्रद्धांजली वाहिली. तिथेच जागा मोकळी करून लोकांना जेवण वाढण्याची व्यवस्था तीन-चार तरुण करत होते, जमलेले नातेवाईक आणि ओळखीचे लोक मान खाली घालून जेवत होते , सर्व लोकांची आणि घरातील बायकांचे जेवण उरकले होते, तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. सर्व जमलेले लोक आपापल्या घरी गेले होते आता घराच्या मागच्या बाजूला घरातील मोजक्या स्त्रिया घरातल्या चर्चा बसल्या होत्या तर पडवीत पुरुष लोक आराम करत होते. घराच्या बाहेरील आवारात जिथे फोटो ठेवला होता तिथे जवळच एक आजोबा झोपले होते. काही वेळाने घरातल्या एका मोठ्या मुलाने तो फोटो उचलून घरात नेउन ठेवला, घराजवळ एक भयान शांतता पसरली त्या शांततेला भेदणारा एक कोकिळेचा आवाज मधून मधून येत होता, पण ते दुसऱ्या कोणाला मंजुळ वाटणारे स्वर कोणा एका व्यक्तीला क्लेशदायक वाटत होते. गेलेल्या व्यक्तीच्या घरापासून चार घर सोडून आपल्या वरच्या मजल्यावरून गेले तेरा दिवस त्या व्यक्तीचे डोळे त्या फोटोचा वेध घेत होते. आता त्या फोटोची जागा रिकामी झाली होती. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आठवणी होत्या, दुख गळ्यापर्यंत दाटून आल होते पण त्या दुखाला मोकळे होण्यासाठी अश्रूंची वाट पुरेशी नव्हती, तिला वाटत होत एकदाच ओरडून रडून घ्यावं पण का ? कधीपासून? असल्या प्रश्नांना द्यायला उत्तरं तिच्याकडे नव्हती. तो या जगात होता तोपर्यंत तिला पहिल्या भेटीच्या आठवणी मोहरून टाकायच्या पण त्याच आठवणी आता जीवघेण्या वाटत होत्या. त्याने प्रेमाची पहिली भेट म्हणून दिलेले एक कि-चेन तिच्याकडे होते त्यात रंगीत पाण्यात एक बाहुला आणि बाहुली एकमेकांना मिठी मारून गोल गोल फिरत होते. त्या वस्तूचा स्पर्श आता आयुष्यात जीवघेण्या रिकामेपणाची जाणीव करून देत होता.

अत्यंत बारकाव्याने लिहिले आहे. सुंदर.
ReplyDeleteMarathi Mhani Aani Tyanche Arth - मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ - Spardha Pariksha Marathi
ReplyDelete