मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला एक वास्तववादी दिग्दर्शक नागराज मंजुळे त्याचा नवा चित्रपट घेऊन येतोय 'सैराट'. त्याच्या 'पिस्तुल्या' आणि 'फ्यांड्री' या दोन्ही फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते आणि आता सैराट सुद्धा त्याच मार्गावर आहे या चित्रपटाचा पिमियर बर्लिनमध्ये होतोय. 'फ्यांड्री' मध्ये समाजातील जातीय व्यवस्थेवरचे भयाण वास्तव एवढे कलात्मक पद्धतीने मांडले होते कि हा चित्रपट कधीही पहिला कि अंगावर काटा उभा राहतो. मी नेहमी मराठी चित्रपट पहात असतो पण काही मोजक्या कलाकृती सोडल्या तर बऱ्याच चित्रपटांकडून माझा अपेक्षा भंग झाला होता, सतत काहीतरी कमी आहे अस वाटायचं २०१३ मध्ये 'दुनियादारी आणि टाइमपास' या दोन्ही व्यावसायिक चित्रपटांना एकामागोमाग घवघवीत यश मिळाले. अशातच 'फ्यांड्री' च्या पुरस्काराची बातमी मिडीयामध्ये झळकत होती. सुरवातीला मला वाटलं कि काहीतरी वेगळ नाव द्यायचं म्हणून 'फ्यांड्री' हे नाव चित्रपटाला दिल असाव आणि पुरस्कार खिशात घातले असावेत पण जेव्हा मी चित्रपट पहिला तेव्हा या चित्रपटाचा आणि नागराज या नावाचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला कि 'फ्यांड्री चित्रपटाशी संबधित जितकी जास्त माहिती गोळा करता येईल तितकी केली. नागराज मंजुळे हे काय रसायन आहे आणि त्याचं दिग्दर्शन कोणत्या उंचीवरच आहे याचा प्रत्यय आला.
ज्या सामाजिक परीस्थित हा माणूस वाढला आहे त्याचे अचूक आणि प्रभावी दर्शन 'सैराट' च्या ट्रेलर मधून दिसतच आहे. मिडीयावर या चित्रपटाची चर्चा जोरात सुरु आहे. नागराज चे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे, चित्रपटाची अजिबात पार्श्वभूमी नसलेले कलाकार सोमनाथ अवघडे राजेश्वरी खरात आणि सुरज पवार यांच्या कडून जेवढे अप्रतिम काम झाले होते तेवढाच सहज अभिनय आकाश तोमर आणि रिंकू राजगुरू यांनी केला आहे हे ट्रेलर पाहूनच समजते. अजय-अतुल च संगीत म्हणजे मेजवानीच आणि कान मंत्रमुग्ध होणारच. २९ एप्रिल ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी नागराजला मन:पूर्वक शुभेच्छा …

No comments:
Post a Comment