'मी गोव्याचा brand ambassador झालो तर?' या विषयावर मी खूप छान निबंध लिहू शकतो. गेल्या १५ वर्षात मी ४ वेळा गोव्याला जाउन आलो. थोडक्यात गोवा हे माझं आवडत ठिकाण आहे! दरवेळी गोवा भेटीत माझ्याबरोबर वेगवेगळे मित्र होते. यावेळी वास्को वास्तव्यास होतो त्यामुळे पणजी आणि गोव्याचे प्रसिद्ध समुद्रकिनारे यापासून बराच लांब प्रवास करून जावं लागत असे. दुचाकीचा पर्याय होता पण पहिला दिवस प्रवासाने थकलो होतो आणि तो दिवस वाया जाऊ नये म्हणून दुचाकीवरून वास्को जवळ एक 'बोगमालो' नावाचा समुद्रकिनारा आहे तिथे गेलो . इतर ठिकाणापेक्षा या समुद्रकिनाऱ्यावर कमी गर्दी असते. पहिला दिवसभर याच समुद्र किनाऱ्यावर आम्ही फिरत होतो. संध्याकाळी वाळूत मित्रां बरोबर गप्पा मारत बसलो होतो अंधार पडू लागला तेव्हा मित्रांपासून हळूच थोडा दूर येऊन समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ गेलो आणि दूरवर एक जहाज होत त्याकडे पाहत बसलो. त्या दिवशी भरती असल्यामुळे मोठा आवाज करत फेसाळणारया लाटा किनाऱ्यावर येऊन पुन्हा त्याच वेगाने परत समुद्रात मिसळत होत्या. हे किती तरी वेळ स्वतःला विसरून पाहत होतो. जगात कितीतरी गोष्टी विशाल आहेत पण मला समुद्राच विशालपण खूप अवर्णनीय वाटत. काही वेळाने मित्रांची बोंब ऐकायला मिळाली आणि मुकामाच्या ठिकाणी निघालो.
वास्को हवाई अड्डा ज्याला 'गोय' किवा 'देबोलियम' ऐअर पोर्ट म्हणतात तिथुन एक किलोमीटर जवळ आम्ही तळ ठोकून होतो. पहिल्या दिवशी दुपारी आम्ही मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो साधं पण बऱ्यापैकी हॉटेल होत ते , जवळच काही मंडळी 'शांभवी' घेत बसले होते. दारू …! त्यांच्याकडे पाहून आणि त्याचं बोलण ऐकून अस वाटत होत कि रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडीतरी घेतली पाहिजे असा गोवा वासीयांचा नियम असला पाहिजे. तस गोवा आणि दारू हे नात खूप सहज जोडलं जात कारण एकतर तिथं एकामागोमाग दारूची दुकान असतात, आणि तीथे ती स्वस्तही मिळते आणि पिवुन तुम्ही गाडीही चालवू शकता. ड्रंक अंड ड्राऐव्ह हा नियम नाही (कृपया मी दारूचा उदोउदो करत नाही) कारण आताच नटसम्राट चित्रपटाची समीक्षा वाचली होती. त्यात दारूपुराण बरच सांगितलं होत अस समीक्षकाच म्हणण होत पण शांभवी हा नवीन शब्द मला याच चित्रपटातून ऐकायला मिळाला, असो पण गोव्यातला बिनधास्तपणा तिथल्या वातावरणाला शोभून दिसतो हे वास्तव आहे.
गोव्यात मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशी हॉटेल सहज मिळत नाहीत. आणि भुकेच्या तडाख्यात आपण एखाद्या हॉटेलात गेलो तर चांगलं जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. आणि इथे भरपूर समूद्र किनारे आहेत म्हणजे प्रत्येक हॉटेलात वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला मिळत असावेत हा फक्त एक समज आहे. त्यामुळे चांगला दर्जा ठेवला तर गोवा हे हॉटेलिंगच्या व्यवसायात पडू पाहणाऱ्या एखाद्या मराठी माणसाला उद्योगाच प्रवेशद्वार होऊ शकत. बाकी समुद्राजवळ आणि पणजी, वास्को, तसेच मडगाव या शहरात स्वच्छता चांगली ठेवली आहे . रस्ते रुंद आहेत, ठिकठिकाणी पोलिस दिसत नाहीत पण अपघात सुद्धा जास्त पाहायला मिळाले नाहीत.
गोवा उशिरा स्वतंत्र झाला येथे पोर्तुगीजाचं राज्य होत, देशात सर्वाधिक परदेशी पर्यटक गोव्यात येतात त्यामुळे इथल्या लोकांच्या किंवा मुळातच गोव्याच्या संस्कृतीला वेगळा मुलामा आहे, म्हणून इथे आलेले देशी पर्यटक यात काही दिवस हरवून जातात. दरवेळी प्रमाणे माझी ही गोवा 'वारी' संपली होती पण परतीच्या प्रवासासाठी माझा पाय निघतच नव्हता.

No comments:
Post a Comment