जाहिरातीतला एक
माणूस टी व्ही बघता बघता चारचूर,
चूरचूर कसलीतरी चिप्स किवा तळलेले पदार्थ खात बसलेला
असतो आणि एसीडीटी होऊ नये म्हणून त्या
पदार्थाबरोबर एक गोळी पण खातो. नऊ सेकंदात ती जाहिरात संपते आणि गोळी
विकणारया कंपनीचा उद्देश सफल होतो,
लोकांच्या मनावर अस
बिंबवले जाते कि अस केले तर आपल्याला 'एसीडीटी' चा त्रास होणार नाही, वेळकाळ न बघता आपण काहीही आणि कितीही प्रमाणात
खाऊ शकतो.
ज्याला पोट किवा
एकूणच आपल्या शरीराची काळजी आहे आणि आहाराबद्दल थोड ज्ञान आहे त्याला चीड आणणारी
हि गोष्ट आहे, आहे पोट म्हणून त्यामध्ये काहीही ढकलणे म्हणजे
अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारख आहे, पोटामध्ये पचनसंस्था
नावाचा महत्वाचा घटक अतिरेकी खाण्यामुळे नादुरुस्त होतो आणि पोटाची कुरबुर
आपल्याला एकू यायला सुरु होते आणि त्यावर गोळीने भागले नाही कि फेस येणारया पुड्या
ग्लासात मोकळ्या केल्या जातात आणि रिचवल्या कि
थोडा वेळ आराम वाटतो, पण खरोखर आपल शरीर इतकं टाकाऊ आहे कि माल
भरायचं गोदाम एवढ आपण त्याच्याशी निर्दयीपणे
वागतो. एकतर आपण भरपेट खाण्याचा
मोह टाळू शकत नाही किवा आपल्याला त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती नसते.
आता आपण
मुद्द्यावरच येऊ. सकाळी आपला जठराग्नी प्रदीप्त असतो त्यामुळे सकाळी केलेला नाश्ता
व्यवस्थित पचन होतो, त्यामुळे सकाळी सकाळी चहा पिण्याएवजी नाश्ता करावा आणि त्यानंतर जवळपास ४५
मिनिटानी चहा घेण्यास हरकत नाही पण नाश्ता तिखट नसावा कारण त्यावर पिलेला चहा
एसिडीटी ला आमंत्रण देतो आणि डोकेदुखी छातीमध्ये जळजळ आणि चमक येणे असले प्रकार
सुरु होतात काहीवेळेस छातीमधल्या चमका आणि ह्रदयविकाराचा झटका यामधला फरक कळत नाही
कारण आपण डॉक्टर नसतो.
नाश्ता दुपारच्या
जेवणापर्यंत पचन होतो आणि आपल्या शरीराला उर्जा मिळालेली असते. त्यामुळे दुपारच
जेवण नेहमीपेक्षा १० % कमी केल्यास अतिउत्तम आणि रात्रीच्या जेवणात अजून १५ % कपात
केली ती तुमची पचन क्रिया योग्यरित्या काम करू लागते.
खालील गोष्टी
अमलात आणा
१
रात्रीच्या किवा
दुपारच्या जेवणानंतर लगेच बाहेर फिरायला
जाण टाळाव कारण जेवण पचनासाठी लागणारा रक्तप्रवाह पोटाकडे केंद्रित झालेला असतो
किमान अर्ध्या तासानंतर फिरायला जाव अन्यथा ह्रदयावर ताण येण्याची शक्यता
असते.
२ बिअर किवा दारू
पिण्याची सवय टाळूच शकत नसाल तर १ तास आधी हलकसं खाव. कारण या गोष्टी
पचनक्रियेसाठी अनअक्सपटेबल आहेत त्यामुळे पोट बिघडणे टाळता येते
* जेवण किवा नाश्ता झाल्यावर फळे खाऊ नयेत, त्याएवजी सकाळी मोकळ्या पोटावर फळे खावीत.
* जेवणानंतर किमान ३ तास चहा पिऊ नये .
* जेवणानंतर किमान ३ तास चहा पिऊ नये .
वरील गोष्टी करा
आणि आरोग्याच्या बऱ्याच समस्यांपासून दूर राहा
No comments:
Post a Comment