Tuesday, December 9, 2014

तुळापूर

काही वर्षांपूर्वी आळंदीला एका लग्नासाठी गेलो होतो, लग्न लागण्याआधी ज्ञानेश्वर महारांजाच्या समाधीच दर्शन घेऊन आलो नंतर दुपारपर्यंत लग्नही पार पडले. आम्ही नऊ ते दहाजण लग्नासाठी जमलो होतो आमच्याजवळ बराच वेळ उरला होता तेवढ्यात एका मित्राने तुळापुरला जाऊन येऊया का ? अस विचारलं आणि जवळपास सर्वांनी होकार दिला, आणि आम्ही तुळापुरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. 

 तुळापुर पुण्यापासून अंदाजे ४० कि. मी. हे ठिकाण शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थानामुळे प्रसिद्ध आहे, शक्यतो बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती असेलही.  तुळापुरला जात असताना मला 'छावा' पुस्तक आणि संभाजी महाराजांचा इतिहास आठवायला लागला. जवळेक अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहचलो. समोर एक भव्य प्रवेशद्वार आहेत त्यावर संभाजी महाराजांचा वाघाचा जबडा फाडणारा पूर्णाकृती पुतळा आहे.  प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक बाग आहे आणि एका टोकाला संभाजी महाराज आणि कवि कलश यांच्या समाधी आहेत. समाधी समोर नमस्कार करून आम्ही भीमा नदी तीराकडे निघालो, तिथं थोडावेळ थांबलो आणि  नदीच्या पलीकडे गेलो तिथं छोट्या टेकडीवर आम्ही सर्वजन जाऊन बसलो, तिथूनच  काही अंतरावर दगडांचा मोठा चौथरा किवा तसलाच काहीतरी भाग होता पण तो किमान दहा - बारा गुंठ्यांचा भाग असावा . आमच्या मित्रांमधून कोणीतरी बोललं कि तेथे औरंगजेबाच्या छावण्या होत्या. पण माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत. त्यावेळेस माझ्या मनात बरेच विचार  येउन गेले.
संभाजी महाराजांना त्यांचे खूप हाल करून मारण्यात आलं त्यांचे डोळे काढले, जीभ कापली  आणि शिरच्छेद केला किती यातना झाल्या असतील कल्पना पण करवत नाही. मराठा साम्रज्याचा राजा असूनही त्यांच्या वाट्याला असल मरण आलं. त्यांचे शीर भाल्यामध्ये अडकवून नदीतीरावर ठेवलं शरीराचे तुकडे तुकडे करून फेकण्यात आले ते तुकडे गोळा करून जवळच्या गावातील लोकांनी भीमा नदीजवळ अंत्यसंस्कार केले, महाराजांचा मित्र कवि कलश यांचा शिरच्छेद केला. 

समाधी जवळ काही लोक आणि लहान मुलं फळविक्री करत बसली होती त्यांना  संभाजी महाराजांविषयी माहिती विचारली आणि जवळपास सर्वांनी एक प्रकारची माहिती सांगितली त्यामध्ये आणि इतिहासातल्या माहितीमध्ये बरेच साम्य होते. आमची निघायची वेळ झाली होती म्हणून आम्ही समाधी बाहेरच्या दिशेने चालू लागलो. माझं मन खिन्न झालं होत तिथल्या वातावरणात मला वेगळच उदासपण जाणवत होत. संभाजी महाराजांच्या धर्मनिष्टेला, सहनशिलतेला, आणि शुरत्वाला एक सलाम केला आणि निघालो परतीच्या प्रवासाकडे.






Thursday, December 4, 2014

पोटावरचे अत्याचार



जाहिरातीतला एक माणूस टी व्ही बघता बघता चारचूर, चूरचूर कसलीतरी चिप्स किवा तळलेले पदार्थ खात बसलेला असतो आणि एसीडीटी होऊ नये म्हणून त्या  पदार्थाबरोबर एक गोळी पण खातो. नऊ सेकंदात ती जाहिरात संपते आणि गोळी विकणारया कंपनीचा उद्देश सफल होतो, लोकांच्या मनावर अस बिंबवले जाते कि अस केले तर आपल्याला 'एसीडीटी' चा त्रास होणार नाही, वेळकाळ न बघता आपण काहीही आणि कितीही प्रमाणात खाऊ शकतो. 

ज्याला पोट किवा एकूणच आपल्या शरीराची काळजी आहे आणि आहाराबद्दल थोड ज्ञान आहे त्याला चीड आणणारी हि गोष्ट आहे, आहे पोट म्हणून त्यामध्ये काहीही ढकलणे म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारख आहे, पोटामध्ये पचनसंस्था नावाचा महत्वाचा घटक अतिरेकी खाण्यामुळे नादुरुस्त होतो आणि पोटाची कुरबुर आपल्याला एकू यायला सुरु होते आणि त्यावर गोळीने भागले नाही कि फेस येणारया पुड्या ग्लासात मोकळ्या केल्या जातात आणि रिचवल्या कि थोडा वेळ आराम वाटतो, पण खरोखर आपल शरीर इतकं टाकाऊ आहे कि माल भरायचं गोदाम  एवढ आपण त्याच्याशी निर्दयीपणे  वागतो. एकतर आपण भरपेट  खाण्याचा मोह टाळू शकत नाही किवा आपल्याला त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती नसते.   

आता आपण मुद्द्यावरच येऊ. सकाळी आपला जठराग्नी प्रदीप्त असतो त्यामुळे सकाळी केलेला नाश्ता व्यवस्थित पचन होतो,  त्यामुळे सकाळी सकाळी चहा पिण्याएवजी नाश्ता करावा आणि त्यानंतर जवळपास ४५ मिनिटानी चहा घेण्यास हरकत नाही पण नाश्ता तिखट नसावा कारण त्यावर पिलेला चहा एसिडीटी ला आमंत्रण देतो आणि डोकेदुखी छातीमध्ये जळजळ आणि चमक येणे असले प्रकार सुरु होतात काहीवेळेस छातीमधल्या चमका आणि ह्रदयविकाराचा झटका यामधला फरक कळत नाही कारण आपण डॉक्टर नसतो. 
            

नाश्ता दुपारच्या जेवणापर्यंत पचन होतो आणि आपल्या शरीराला उर्जा मिळालेली असते. त्यामुळे दुपारच जेवण नेहमीपेक्षा १० % कमी केल्यास अतिउत्तम आणि रात्रीच्या जेवणात अजून १५ % कपात केली ती तुमची पचन क्रिया योग्यरित्या काम करू लागते.



खालील गोष्टी अमलात आणा

        रात्रीच्या किवा दुपारच्या  जेवणानंतर लगेच बाहेर फिरायला जाण टाळाव कारण जेवण पचनासाठी लागणारा रक्तप्रवाह पोटाकडे केंद्रित झालेला असतो किमान अर्ध्या तासानंतर फिरायला जाव अन्यथा ह्रदयावर ताण येण्याची शक्यता असते. 

      बिअर किवा दारू पिण्याची सवय टाळूच शकत नसाल तर १ तास आधी हलकसं खाव. कारण या गोष्टी पचनक्रियेसाठी अनअक्सपटेबल आहेत त्यामुळे पोट बिघडणे टाळता येते

*   जेवण किवा नाश्ता झाल्यावर  फळे  खाऊ नयेत, त्याएवजी सकाळी मोकळ्या पोटावर फळे खावीत.   
    
*       जेवणानंतर किमान ३ तास चहा पिऊ नये .



वरील गोष्टी करा आणि आरोग्याच्या बऱ्याच समस्यांपासून दूर राहा