बिहार मध्ये गया जिल्हयात गेहलोर या मागासलेल्या एका छोट्या गावात एक सामान्य माणूस एकटा डोंगर पोखरुन आपल्या गावासाठी रस्ता तयार करायच ठरवतो आणि एक मोठी संघर्षयात्रा सुरु होते . आपल्या पत्नीचा जीव ज्या पर्वतावर पाय घसरुन गेला त्या पर्वताचा भेद करुन एक रस्ता तयार करण्याचा निश्चय करतो ज्यामुळे हजारो लोकांना पर्वताला परिक्रमा घालताना होणारा त्रास कमी होईल ही जनोपयोगी भावना.
नाव दशरथ मांझी ३६८ फुट लांब आणि २५ फुट रुंद रस्ता बनविन्याचा विडा उचलल्या सारखा दोन हाथ करायला सुरुवात करतो आणि २२ वर्ष हा व्यक्ति आपल्या श्रमाने आणि क्लूप्तिने या पर्वताचा भेद करतो. पण इतकी साधी आणि सोपी गोष्ट असेल का हो ही! दुष्काळ आणि सतराशे साठ विघ्न याना तोंड देत हा तपस्वी पर्वताला स्वतच दिलेले आव्हान पूर्ण करतो. हा संघर्ष उत्तमरीत्या मांझी या चित्रपटात दाखवला आहे.
दशरथ मांझीने हातात घेतलेले काम आणि २२ वर्षे शारीरिक कष्ट आणि येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडु शकले असते आणि पर्वत फोडून रस्ता तयार करण्याचे आव्हान कधीच संपुष्टात आले असते, पण स्वतःच्या २५ पट जास्त वजन उचलु पाहणाऱ्या प्रयत्नवादी मुंगी कडून प्रेरणा घेतल्यासारखी पराकष्टा करुन रस्ता तयार केला.
२००७ मध्ये दिल्ली येथे एका रुग्णालयात कैंसरशी झुंज देत शेवटचा श्वास घेतला. राजकिय उदसिनतेमुळे गेहलोर गावासाठी पक्का रस्ता त्यांच्या मृत्युनंतर ४ वर्षानी तयार झाला.दशरथ मांझीच्या मिडिया वरील एका मुलाखती मध्ये ते म्हणतात जोपर्यंत ही पृथ्वी आहे तो पर्यन्त हा रस्ता राहील. एका पहाडाशी दुसऱ्या पहाडा एवडया व्यक्तिमत्वाने घेतलेली मैत्रीपूर्ण झुंज म्हणजे सकारात्मकतेची गाथा झाली.