शिवजयंती १९ फेब्रु. २०१५ निमित्ताने
खूप वर्षांपूर्वी रणजीत देसाई यांचे 'श्रीमान योगी' हे पुस्तक वाचले होते, अशी शेकडो छोटी मोठी पुस्तके छ. शिवाजी महाराजांविषयी लिहिली गेली आहेत , पण वाचून समाधान वाटेल अस या पुस्तकात काही लिहलं गेल नसावं. शिवकालीन खरा इतिहास समोर आणणारी पुस्तके हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. खूप जणांना असही वाटत असेल कि ' काय करायचं आहे या इतिहासाच ' खर -खोट करून. फेसबुक आणि व्हाटसप सुद्धा आउटडेटेड होत चाललेल्या जगात या इतिहासाने काय फरक पडतो. सतत नवीन टेक्नोलॉंजी येते आहे जग वेळेच्या पुढे धावतंय. पण हे पत्येक वेळेस नवीन येणारं झपाटयान मागे सुद्धा पडतंय मग ते कोणतही क्षेत्र असो त्यामध्ये एक व्यतिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज जे लोकांच्या मनावर साढे तीनशे वर्षांच्या वर काळ लोटला तरी अढळ आहे. महाराष्ट्रात जन्माला येणारया प्रत्येक पिढीला महाराजांचं व्यतिमत्व त्यांचा इतिहास कमी अधिक प्रमाणात का होईना आकर्षित करतोच (काही अपवाद असतात -- ऑनलाईन जन्मलेली एन्टीक ओब्जेक्ट्स ) ….
तर काय फरक पडतो, या खऱ्या
इतिहासामुळे ? त्याचं उत्तर आहे 'हो' ! फरक पडतो किमान शिवाजी महाराजांच्या इतिहासाने
तर पडेलच असा हा इतिहास आणि तितकेच मोठे आहेत महाराज. समाजातल्या सर्व जाती
-धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि निर्माण केलेलं ते साम्राज्य पुरंदरच्या तहात जवळपास गमावलं.
तरीही महाराजांनी कधी हार मानली नाही. या दोन्ही गोष्टीतून महाराजांचा जीवनाकडे
पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक आणि प्रयत्नवादी होता हेच वाटेल. अशा कितीतरी गोष्टी या इतिहासात घडल्या
ज्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पण त्यासाठी योग्य आणि खरी माहिती देणारं
पुस्तक उपलब्ध असलं पाहिजे.
असच एक पुस्तक मी वाचलं कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?' हे पुस्तक अप्रतिम आहे, वाचायला जास्तीत
जास्त अर्धा ते पाऊन तास लागतो, हे पुस्तक तुमचा अमूल्य असा वेळ घेणार नाही.
७० पानांचं हे पुस्तक तुम्हाला ' शिवाजी महाराज कि जय' अस का म्हणायचं
याच उत्तर देईल. महाराजांनी या भूमीसाठी नेमकं काय केलं याबद्दल पण बऱ्याच जनांना
माहिती नसेल किवा चुकीची माहिती असेल, ज्यांना
महाराजांबद्दल वाचायला, बोलायला आवडतं त्यांनी तर नक्कीच वाचावं.